नाशिक मध्ये वीस हुन अधिक बिल्डरांवर आयकराचे छापे
नाशिक मध्ये वीस हुन अधिक बिल्डरांवर आयकराचे छापे
लेवाजगत नाशिक -नाशिक शहर व परिसरातील २० हून अधिक बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर व निवासस्थनी, फार्महाऊसवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मंुबई कार्यालयातील १२५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी ७५ हून अधिक वाहनांचा ताफा व्यावसायिकांच्या कार्यालयासमाेर उभा हाेता.
शहरातील महात्मा गांधी राेडवरील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पहाटे सहा वाजेपासूनच अधिकाऱ्यांनी प्रवेश करून हिशाेबाची कागदपत्रे तपासणी सुरू करण्यात आली. यापाठाेपाठ रविवार कारंजा, गंगापूरराेड, काॅलेजराेड, मुंबई नाका, फेम टाॅकीजसमाेरील, अशाेक मार्ग, द्वारका व नाशिकराेड भागातील बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालये, त्यांच्या व्यवस्थापकांसह अकाउंटंट, मालक, संचालकांची चाैकशी करण्यात आली. आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यातील बहुतांशी व्यावसायिकांच्या माेठ्या प्रमाणात शहरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्यांच्याकडून कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
तब्बल १२ तासांहून जास्त काळ तपासणी
नाशिकसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरच्या पथकांनी बुधवारी रात्रीच शिर्डी येथे एकत्रित बैठक घेऊन गुरुवारी (दि. २०) पहाटेच नियोजन केले. अधिकारी संशय येऊ नये यासाठी वेगवगेळ्या ठिकाणाहून कारमधून पोहोचले. पहाटे ६ वाजेपासून बिल्डरच्या कार्यालयाबाहेर वाहने व पोलिस दिसताच छाप्यांची चर्च सुरू झाली.
इगतपुरी येथेही छापासत्र
आयकर विभागाचे नाशिक शहरात ठिकठिकाणी छापासत्र सुरू असतानाच त्याच पथकातील वेगवेगळ्या टीम या सकाळीच इगतपुरी शहरात व महामार्गावरील इगतपुरीनजीक हाॅटेल-रिसाॅर्टवर छापा टाकला. इगतपुरी शहरातील एका बड्या लाॅटरी व्यावसायिकाकडे जवळपास १० ते १५ अधिकाऱ्यांनी तळ ठाेकून दिवसभर चाैकशी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत