Contact Banner

भुसावळच्या प्रांताधिकारीपदी जितेंद्र पाटील !

 



भुसावळच्या प्रांताधिकारीपदी जितेंद्र पाटील !

लेवाजगत न्यूज सावदा-रामसिंग सुलाणे यांच्या निलंबनाने रिक्त झालेल्या भुसावळच्या प्रांताधिकारीपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या तक्रारींच्या नंतर भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली होती. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सुलाणे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

     दरम्यान, रामसिंग सुलाणे यांच्या जागी राज्य शासनाने जितेंद्र पाटील यांची नियुक्ती केली असून याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. ते सध्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाली असून त्यांना भुसावळ येथे नियुक्ती मिळालेली आहे. यामुळे आता ते भुसावळचे प्रांताधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.