आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस सामाजिक विविध उपक्रमांद्वारे उरण तालुक्यात साजरा
आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस सामाजिक विविध उपक्रमांद्वारे उरण तालुक्यात साजरा
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब ह्यांचा वाढदिवस कर्जत, खालापूर आणि उरण तालुक्यात मोठया उत्साहात साजरा केला गेला.
उरण तालुक्यात त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख श्री रुपेश पाटील ह्यांनी रानसई कातकरी वाडी येथे आदिवासी बालकांसाठी शालो पयोगी साहित्य आणि खाउचे वाटप तसेच दैनदिन गरजे साठी आधार कार्ड नोंदणी पॅनकार्ड तसेच रेशन कार्ड ची सध्याची असलेली गरज व त्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती बाबत जनजागरण करून नोंदणी करणे असा कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेना शाखा, जसखार तालुका उरण ह्यांच्या उत्साही सहभागाने सदर कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम श्री रुपेश पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ह्याप्रसंगी उरण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी विभागप्रमुख गणेश घरत, शाखाप्रमुख अमित ठाकूर, ग्रामपंचायत जसखार उपसरपंच सौ.प्रणाली किशोर म्हात्रे सदस्या सौ.हेमलता भालचंद्र ठाकुर तसेच सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, हर्षल ठाकूर, तेजस घरत आदी शिवसैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महेश कातकरी माजी उपसरपंच, सुनील जोशी, नामदेव ठाकूर हे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि विंधने ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सदर कार्यक्रमास उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत