"महामानवाच्या जयंती दिनी दसनुर येथे अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन...."
"महामानवाच्या जयंती दिनी दसनुर येथे अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन...."
लेवाजगत न्युज सावदा:-
शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. ज्ञानाने माणूस विवेकी बनतो,आजच्या स्पर्धेच्या युगात जर आपली ज्ञान नौका पार करायची असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही.
आज आमच्या परिसरातील हिरव्यागार शेतीने आणि ज्ञानाने समृध्द अस गाव म्हणजे दसनुर आणि अश्या ज्ञानाने समृध्द चांगल्या विचारांची पेरणी करून उद्याच नेतृत्व आणि अधिकारी तयार करण्याची धमक असणाऱ्या गावात आज "यशस्तंभ अकॅडमी "च्या
अभ्यासिका वर्गाचे शानदार उद्घाटन उमेश्र्वर माध्यमिक विद्यालय दसनुरचे कृतिशील ,उपक्रमशील मुख्याध्यापक,आदरणीय श्री.एस.जी.महाजन सर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री.आर.एल.तायडे सर विद्यालयाचे निवृत्त पर्यवेक्षक आदरणीय श्री.बी.जे.तायडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रज्ञासुर्य बोधिसत्व पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वती मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे सर्व आदरणीय ज्येष्ठ शिक्षक ,शिक्षिका कर्मचारी मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद रुपी शुभेच्छा अकॅडमी चे संचालक श्री.विलास तायडे सर व श्री.प्रशांत तायडे सर यांना देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत