मस्कावदला भीषण आग, दुचाकीसह गुरांचा चारा खाक
मस्कावदला भीषण आग, दुचाकीसह गुरांचा चारा खाक
लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या मस्कावद येथे गुरे बांधलेल्या खळ्यात अचानक. शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. पाहता-पाहता या आगीचा भडका वाढल्याने दुचाकीसह गुरांचा चारा जळून खाक झाला तर सुदैवाने गुरांना वाचवण्यात यश आले. या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची भीती आहे. ग्रामस्थांची धडपड
मस्कावद गावातील शेतकरी जितेंद्र चौधरी व सोपान तेली यांनी गुरांसाठी खळा बांधला असून त्यात मोठ्या प्रमाणावर शेती साहित्यासह गुरे बांधलेली होती. सोमवारी सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने खळ्यात आग लागली व त्यात चाऱ्याचा कूट, ठिबक नळ्या, पाईप, लाकडे तसेच दुचाकी खाक झाली, मात्र सुदैवाने ग्रामस्थांना गुरे वाचवण्यात यश आले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत