पुण्यात होर्डिंग अंगावर पडून पाच जण जागीच ठार
पुण्यात होर्डिंग अंगावर पडून पाच जण जागीच ठार
लेवाजगत न्यूज पुणे -देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे सोमवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्याने रस्त्याजवळील मोठे होर्डिंग अचानक कोसळले. या होर्डिंग खाली दबून पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत व्यक्तींमध्ये चार महिलांचा समावेश असून तीन जण या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सांगितले की, साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रावेत पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. कटरच्या साह्याने होर्डिंग कट करून तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह बाजुला काढण्यात आले. दरम्यान, मृतांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत