Contact Banner

पोलीस पाटील व कोतवालांची भरती प्रक्रिया मे महिन्यात होणार सुरु

Police-Patil-and-Kotwal-recruitment-procedure-will-be-started-in-the-month-of-May

 

पोलीस पाटील व कोतवालांची भरती प्रक्रिया मे महिन्यात होणार सुरु 

लेवाजगत न्यूज जळगाव -जिल्ह्यात सेवानिवृत्ती, मृत्यू व इतर कारणांनी‎ पोलिस पाटील यांची ३१२ तर कोतवालांची ९९‎ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय‎ कामकाजावर विपरित परिणाम होत‎ असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून‎ १० जूनपर्यंत बिंदुनामावली तपासून‎ घेतल्यानंतर रिक्तपदांची भरती प्रक्रिया‎ राबवण्यात येणार आहे.‎ 

  कोतवाल भरतीच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये‎ सुधारणा करण्याबाबत कोतवाल सेवा प्रवेश‎ नियमात काही सुधारणा व नवीन सेवा प्रवेश‎ नियमास शासनाने मान्यता दिलेली आहे.‎ त्याअनुषंगाने कोतवाल भरती प्रक्रिया‎ राबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या‎ अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली‎ आहे. या समितीत एकात्मिक आदिवासी‎ विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी,‎ सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त‎ सदस्य आहेत. तहसीलदार सदस्य सचिव‎ आहेत. जिल्ह्यात कोतवालांची ४९५ पदे मंजूर‎ आहेत. त्यापैकी ३९६ पदे भरलेली असून ९९‎ पदे रिक्त आहेत. कोतवालांची पदे भरताना‎ सुधारित नियमानुसार पदे भरण्याची कार्यवाही‎ करण्यात येणार आहे. ही पदे भरताना सर्व‎ ठिकाणी समानता येईल याबाबत नियुक्ती‎ प्राधिकाऱ्याने दक्षता घ्यावी. नियमांचे‎ कोटेकोर पालन करण्याबाबतच्या सूचना‎ देण्यात आलेल्या आहेत.‎

    जळगाव ६, जामनेर ७, एरंडोल ४, धरणगाव‎ ६, पारोळा ६, भुसावळ २, बोदवड ४,‎ मुक्ताईनगर ७, रावेर ८, यावल ६, पाचोरा ८,‎ भडगाव ८, चाळीसगाव ८, अमळनेर ७ व‎ चोपडा १२.‎

    २५ मेपर्यंत‎ विभागीय आयुक्त कार्यालयातील‎ मागासवर्ग कक्षाकडून १० मे पर्यंत‎ बिंदुनामावली तपासून घेण्यात‎ येणार आहे. गावनिहाय आरक्षण‎ २५ मे पर्यंत ठरवण्यात येणार‎ आहे. कोतवाल व पोलिस पाटील‎ पदाचा जाहीरनामा ३१ मे पर्यंत‎ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या‎ पदांसाठी उमेदवारांना अर्ज‎ भरण्याची मुदत १ ते २० जूनपर्यंत‎ राहणार आहे, अशी माहिती‎ प्रशासनाने दिली आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.