जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी
जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी
लेवाजगत न्युज बोदवड:- दि.28 एप्रिल 2023 रोजी जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) श्री.जितेंद्र पाटील यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे बोदवड तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन देऊन धिर दिला.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह उपविभागीय अधिकारी (प्रांत) श्री.जितेंद्र पाटील, येवती सरपंच श्री.शांताराम वाघ, श्री.अनिल अहिर, श्री.भिमराव पाटील, श्री.सुनिल माळी, श्री.योगेश कादेल, श्री.मयूर बडगुजर, श्री.विक्रम वरकड, श्री.मधुकर महाजन, श्री.भगवान महाजन, श्री.मनोहर पाटील ई. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत