Contact Banner

सरपंचानी नोटा उधळत आंदोलन केल्याने फुलंब्री चे बीडीओ ला गिरीश महाजन यांनी केले तत्काळ निलंबित


 सरपंचानी नोटा उधळत आंदोलन केल्याने फुलंब्री चे बीडीओ ला गिरीश महाजन यांनी केले तत्काळ निलंबित 

लेवाजगत न्युज छत्रपती संभाजीनगर-फुलब्री तालुक्यातील सरपंच साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे.

फुलंब्री पंचायत समिती आवारात नोटांचा पाऊस ,सरपंचाचा अनोख्या आंदोलनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर

https://youtu.be/EFYKic26yQE


   दरम्यान या प्रकरणी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, हा निर्णय स्वागातार्ह आहे. मंत्री महाजन यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. मी उधळलेले पैसै मला वापस करावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. कारण हा सर्व पैसा माझ्या शेतकरी बांधवांच्या घामाचा पैसा आहे.

     शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून घेण्यासाठी फुलंब्री येथील सरपंचाने पंचायत समिती समोर पैसे उधळत अनोखे आंदोलन केले. विहिरीला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के मागत असल्याचा आरोप गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला आहे. तीच रक्कम मी येथे घेऊन आलो, आणखी रक्कम लागली तर शेतकऱ्यांसोबत जमा करून देतो, असा संतापही यावेळी सरपंच साबळे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.