Contact Banner

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याचा संशय, अलर्ट जारी

 

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याचा संशय, अलर्ट जारी
           (काल्पनिक चित्र)

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याचा संशय, अलर्ट जारी

वृत्तसंस्था पालघर-मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट दिसली आहे. या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून ही बोट शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. तेव्हापासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशायस्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक जॉईंट ऑपरेशन सेंटर नावाची एक संस्था बनवण्यात आली होती. या संस्थेकडून पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसल्याची आणि त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यानुसार मुंबईच्या किनारपट्टीजवळ एका लाईट हाऊसच्या जवळच ही बोट दिसली. त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर सर्व संरक्षण संस्था सक्रिय झाल्या आहेत. सागरी पोलीस आणि नौदलाकडून ही बोट शोधण्याचं काम सुरू आहे.

    पालघर पोलिसांनी माहिती दिली आहे की, या बोटीवर दोन पाकिस्तानी नागरिक आहे. तसेच ही बोट गेटवे ऑफ इंडियापासून दक्षिणेकडे ५० नॉटिकल मील दूर पालघरमध्ये दिसली आहे. इंटेलिजेन्स ब्युरो आणि सीबीआयदेखील ही बोटीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ही बोट शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.