Contact Banner

शिवशाही बसला आग प्रसंगावधानाने प्रवाशांचे वाचले प्राण

शिवशाही बसला आग प्रसंगावधानाने प्रवाशांचे वाचले प्राण


 शिवशाही बसला आग प्रसंगावधानाने प्रवाशांचे वाचले प्राण 

वृत्तसंस्था नागपूर- अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसला आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास आग लागली. बस कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना अचानक गाडीतून धूर येत गाडीने पेट घेतला. मात्र, चालकांच्या प्रसंगावधानाने गाडीतील प्रवासी बचावले. चालकाने ब्रेक लावत गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.





   नागपूर ते अमरावती जाणारी शिवशाही बस (एमएच- ०६ बीडब्लू- ०७८८) सकाळीच नागपूरहून निघाली होती. गाडी कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बस लगेच रस्त्याच्या कडेला लावली, यावेळी वाहक (कंडक्टर) उज्वल देशपांडे यांनी गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी गाडीत असलेले१६ ही प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

    दरम्यान प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केल्याने यात जळून संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पर्यंत बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढे पाठविण्यात आले.



महिन्यात दुसरी घटना 

     शिवशाही बसच्या मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या अन् धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवित बस थांबवित प्रवाशांना पटापट बसच्या बाहेर काढले. फायर इंस्टिग्यूशरने आग विझविली. शिवशाही बस (एमएच ०६बीडब्ल्यू-०२८९) अमरावती डेपोची आहे. चालक अमोल मोहरकार आणि वाहक लाईक खान यांच्यावर बसची जबाबदारी होती. ही बस नागपुरच्या गणेशपेठ डेपोतून अमरावतीसाठी निघाली. बसमध्ये आठ प्रवासी होते. वाडीमार्गे निघालेल्या बसने गोडखैरी टोल नाका ओलांडल्यावर मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघू लागला. वाऱ्याने धुर पसरत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.