Contact Banner

प्रा. व. पु. होले यांच्या पुस्तकांचे उद्या प्रकाशन

 

Tomorrow-publication-of-the-books-of-Pra-V-Pu-Hole

प्रा. व. पु. होले यांच्या पुस्तकांचे उद्या प्रकाशन 

लेवाजगत न्यूज सावदा -येथील कथाकथनकार व साहित्यिक प्रा. व.पु. होले यांच्या 'कौतुक तू पाहे संचिताचे' व 'तर आनंदतरंग उठणारच' या दोन पुस्तकांचे प्रकाशन, जळगाव येथील केसीई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मंगळवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत उमरीकर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन यांच्याहस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर असतील. उपस्थितीचे आवाहन डॉ. अशोक राणे, डॉ. सं. ना. भारंबे यांनी केले आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.