Contact Banner

उदळीच्या तरुणाला साडेनऊ लाखाचा शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा

Udali-Taruna-was-sold-9-and-a-half-lakh-in-the-name-of-the-share-market.


उदळीच्या तरुणाला साडेनऊ लाखाचा शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा

लेवाजगत न्यूज सावदा -रावेर तालुक्यातील उदळी येथील शेतकरी तरुणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी द्वारे नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नऊ लाख तीस हजाराचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उदळी येथील भूषण दत्तात्रय बऱ्हाटे वय ३९ या तरुणाला १४ डिसेंबर २०२२ ते एक एप्रिल २०२३ दरम्यान अजय व निखिल या दोन नावाच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला भूषण  यास ओरियन व रोबो या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा प्रमाणात फायदा मिळेल अशी बतावणे संचयतांनी करीत विश्वास मिळवला शेअर खरेदी करण्यासाठी भूषण बऱ्हाटे यांच्याकडून वेळोवेळी एकूण नऊ लाख तीस हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. मात्र त्या बदल्यात भूषण यास नफाही मिळाला नाही व मुद्दल रक्कम ही संबंधितांनी परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर दोन दिवसानंतर भूषण मराठे यांनी याबाबत सायबर पोलिसात तक्रार केल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.