BPCL. प्रकल्पग्रस्त (PAP) भूमिपुत्रांवर कंपनी प्रशासनाकडून होणाऱ्या अन्याया विरोधात भेंडखळ ग्रामस्थां चे तीव्र आंदोलन
BPCL. प्रकल्पग्रस्त (PAP) भूमिपुत्रांवर कंपनी प्रशासनाकडून होणाऱ्या अन्याया विरोधात भेंडखळ ग्रामस्थां चे तीव्र आंदोलन
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ). उरण तालुक्यातील भेंडखळ गावात बी.पी. सी. एल. (भारत पेट्रोलियम) कंपनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहे. आणि त्यामुळे येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत. कंपनी प्रशासनाने शासन निर्णय (क्र. एईएम १९८०/३५/१६-अ दि. २१ जाने १९८०) नुसार येथील प्रकल्पग्रस्त (PAP) शेतकरी आणि त्यांच्या वारसदारांना नोकरीत करीत सामावून घेणे क्रमप्राप्त असतांना कंपनी प्रशासन आणिवपूर्वक स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे. कंपनीच्या या अडमुठे धोरणाविरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र तरुण हे दि. १७ आक्टो. २०२२ पासून कंपनी गेट समोर साखळी उपोषण करत आहेत. सदर उपोषणाचा आज 175 या दिवस आहे. या 175 दिवसाच्या प्रदिर्घ काळात एकदा ही कंपनी प्रशासनातील एकाही अधिकार्याने या संवैधानिक आणि शाततापूर्ण असा साखळी उपोषणाची दखल घेतल्याचे निदर्शनास आले नाही.
प्रकल्पग्रस्त कायद्यानुसार जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त लोकांनी उदरनिर्वाहासाठी शासन नियमाप्रमाणे नोकरीची अपेक्षा करणे गैर आहे का? केवळ नोकरी आणि वारसदारांची नोकरी एवढ्या गोष्टीसाठी 175 दिवस जर साखळी उपोषण करावे लागत असेल तर खरोखर आम्ही स्वतंत्र भारतात आहोत का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत... जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीने अनेकदा पाठपुरवा करुन देखील कंपनी गैरकायदेशीर आणि गैरसंवैधानिक पद्धतीने भूमिपुत्रावर दबाव निर्माण करुन आंदोलनाला व आंदोलकांना धमकाविण्याचा अट्टाहास करत आहे. BPCL च्या माध्यमातून सुरु असलेल्या या अन्याया विरोधात भेंडखळ BPCL प्रकल्पग्रस्त समिती, भारत मुक्ती मोर्चा व आंदोलन निर्माण समिती च्या वतीने BPCL कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन आयोजित केले आहे. संविधानाच्या कलम 19 अनुसार आमच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात संविधानाच्या चौकटीत राहून हे आंदोलन करणार आहोत.या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला ल भेंडखळ गावाचे सरपंच.उपसरपंच सदस्य ग्रामस्थ भेंडखळ . मनोज राम धरणे (राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे सचिव ).लक्ष्मण ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते भेंडखळ )पोलारिस कंपनी सफाई कामगार सह ग्रामस्थ भेंडखळ यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत