लष्करातील स्वयंपाकीकडून बालिकेवर अत्याचार
लष्करातील स्वयंपाकीकडून बालिकेवर अत्याचार
वृत्तसंस्था पुणे : लष्करात स्वयंपाकी असलेल्या एकाने सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्करात स्वयंपाकी असलेल्या एकास अटक करण्यात आली आहे.
विनोदकुमार दिनेश सिंग (रा. दिघी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित बालिकेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सात वर्षांची बालिका वसाहतीतील उद्यानात खेळत होती. त्या वेळी सिंगने बालिकेला आमिष दाखवून उद्यानातील झुडपात नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केले. घाबरलेल्या बालिकेने या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सिंगला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत