Contact Banner

बोहल्यावर चढण्यापूर्वीच वरात पोलीस ठाण्यात

 

After carrying-before boarding-to the groom-at-the-police station

बोहल्यावर चढण्यापूर्वीच वरात पोलीस ठाण्यात

लेवाजगत न्यूज रावेर-महिन्याभरापूर्वी पहिले लग्न झालेले असताना पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसऱ्या मुलीशी लग्न करणाऱ्या नवरोबाची वरात बोहल्यावर चढण्यापूर्वीच पोलीस ठाण्यात पोहचली. एक महिला लग्न मंडपात गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून खात्री करण्याच्या सूचना दिल्या. मंडपात दाखल होत पोलिसांनी हस्तक्षेप केला असता गोंधळ घालणारी महिला नवरदेवाची पहिली पत्नी असल्याची माहिती मिळाली. या महिलेने स्वतःच्या पतीचा दुसऱ्या विवाहाचा डाव उधळून लावला आहे. अखेर समाजातील जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी करीत हा विवाह रोखला आहे. पातोंडा जि. बऱ्हाणपूर येथील एका उच्च शिक्षित युवकाचे तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या मुलीशी १२ मे रोजी लग्न निश्चित झालेले होते. हे लग्न येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात होणार होते. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पहिल्या पत्नीला पुणे येथेच सोडून नवरदेव मुलगा दुसऱ्या विवाहासाठी येथे आलेला होता. विवाह मंडपातील बोहल्यावर नवरदेव चढून वधूवरांच्या डोक्यावर अवघ्या काही मिनिटात अक्षता पडणार होत्या. मात्र नवऱ्या मुलाची पहिली पत्नी अचानक पुणे येथून येऊन लग्न मंडपात दाखल झाली. नवरदेव असलेल्या मुलाचे माझ्याशी महिनाभरापूर्वी आळंदी येथे लग्न झाल्याचा दावा तिने यावेळी लग्नमंडपात उपस्थितांसमोर केला. यामुळे लग्न मंडपात एकाच गोंधळ उडाला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सत्यता जाणून घेतली. लग्नासाठी आलेल्या नवरदेवाचे पोलिसांनी लग्न रोखत चौकशीसाठी नवरदेवाची वरात थेट लग्न मंडपातून पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी चौकशी केली असता पहिल्या पत्नीने या मुलाचा पहिला विवाह माझ्याशी झाल्याची माहिती दिली. यामुळे फसवणूक करणाऱ्या नवऱ्या मुलाचे पितळ उघडे पडले. नवरदेव असलेल्या या मुलाचे गेल्या काही दिवसापासून बऱ्हाणपूर येथील दुसऱ्या समाजा मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी महिनाभरापूर्वी एप्रिलमध्ये आ येथे जाऊन विवाह लावला होता मात्र याची माहिती मला पातोंडा येथील कुटुंबियांना दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलासाठी रावेर तालुक्यातील एका गावातील स्थळ निश्चित करून विवाहाचे १२ मे रोजी आयोजन केले होते. तसेच पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करण्याचा डाव पहिल्या पत्नीच्या जागरूकतेमुळे मोडून पडला आहे. दुसऱ्या विवाहाची डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच नवऱ्या मुलाचा प्रताप त्याची पूर्वाश्रमीची प्रेमिका व पहिल्या पत्नीने उघडकीस आणला. अखेर शुक्रवारी होणारा हा विवाह थांबविण्यात आला आहे. नवरोबाने दिली पाहल्या लग्नाची कबुली आळंदी येथे बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेल्या मुलीशी पहिले लग्न गेल्या महिन्यात केलेले असल्याची कबुली नवरोबाने पोलिसांना चौकशीत दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.