अबब.. 8 मिनिटात सोळा लाख पंचेचाळीस हजार लंपास जरुड मध्ये एटीएम गॅस कटरने फोडले
अबब.. 8 मिनिटात सोळा लाख पंचेचाळीस हजार लंपास
जरुड मध्ये एटीएम गॅस कटरने फोडले
लेवाजगत न्युज वरुड (तालुका प्रतिनीधी ):- तालुक्यातील जरूड येथील मांगरूळी रोडवरील वानखडे पॅलेस मध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जरुडच्या एटीएम गॅस करटरने कापून दरोडेखोरांनी अवघ्या 8 मिनिटात 16 लाख 45 हजार 500 रूपये दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
पोलिससुत्रानी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार (ता.12) पहाटे 2.58 वाजता एका लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांकाच्या (T 04 23 HP 2520 ) गाडीने आलेल्या दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने चक्क एटीएम मशिन फोडून त्यात असलेले पैश्याचे स्ट्रे उचलून नेले.
केवळ अवघ्या 8 मिनिटात म्हणजेच रात्री 3 वाजून 6 मी. दरोडा टाकून पसार झाले. हा सर्व प्रकार एटीएम मध्ये लागलेल्या सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाल्याने दरोडेखोर अत्यंत प्रशिक्षित आणि सराईत गुन्हेगार असल्याने सदर एटीएम ची यापूर्वी येवून रेकी केली असावी. असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे, सी.आय.डी आयकार्ड युनिट,अमरावती चे ए पी आय बोंडे,अक्षय रेवडकर, राजेन्द गुहे, आदींनी घटनास्थळाला भेट दिली असून अज्ञात गुन्हेगारा विरुद्ध भा द वी 380 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपण कोल्हे, एपीआय रविंद्र राजूरकर, मडावी, सुनिल अकोलकर यांच्या सह वरुड पोलीस तपास करीत आहे.
आंतर राज्यीय टोळी असल्याचा संशय ....
सदर गुन्हेगार अत्यंत सराईत असल्याने आणि सोबतच गाडीच्या डिकीत गॅस कटर आणि सिलेंडर घेवून अवघ्या 8 मिनिटात 16 लाख 45 हजार रुपयाचा दरोडा टाकून रोकड घेऊन पसार झाल्याने त्या दरोडेखोरांची आंतर राज्यिय टोळी असावी, व समोर एखादा कंटेनर उभा करून घटनेच्या वेळी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी कंटेनर मध्ये लपवून पसार झाले असावे असा कयास पोलिसांनकडून वर्तविला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत