कृषी पतसंस्था व बहूउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा
कृषी पतसंस्था व बहूउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा
उरण (सुनील ठाकूर )शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भोपी यांना ५४० तर अमिताभ भगत यांना ५२० मते मिळाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी आणि शैलेश पाटील यांचा महाविकास आघाडीच्या दोन्ही
उमेदवारांनी दारुण पराभव करीत धुव्वा उडवला.
कृषी पतसंस्था व बहूउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे सलीम तांडेल (१४८), अनंत पाटील (१४८), संजय पाटील (१५१), स्वप्निल पाटील (१४८), यशवंत भगत (१४५), अशोक म्हात्रे (१४५), कमळाकर साखळे (१४३) हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर शिंदे गटाच्या नंदन पाटील आणि संदेश प्र थळे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व्यापारी आणि अडत्यांचा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिक पाटील (२१२) तसेच सुभाष वागळे (२०६) यांनी विजय मिळवत
: शिंदे गटाचे संजय भावे यांचा पराभव केला. शुक्रवारी अलिबागमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १४९३ पैकी १३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८८ टक्के मतदान झाले. आघाडीने आपले बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्चस्व मिळवले आहे. •
मात्र, काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हे मतदान घेण्यात आले. अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागापैकी ७ बिनविरोध तर ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांसाठी १३, ग्रामपंचायती मतदारसंघात ४ जागांसाठी ६, व्यापारी / आडते मतदारसंघात २ जागांसाठी ३ तर हमाल / व्यापारी मतदार संघात महाविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत