Contact Banner

उन्हाळी सुटीमुळे दिव्यांग बोर्ड ३१ पर्यंत असेल बंद

 

Disability-Board-will-be-closed-till-31st-May-due-to-summer-vacation

उन्हाळी सुटीमुळे दिव्यांग बोर्ड ३१ पर्यंत असेल बंद 

लेवाजगत न्यूज जळगाव- जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग रुग्णांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाते. यासाठी रुग्णालयात टोकन सिस्टीम राबवली जाते आहे. मात्र, सध्या प्राध्यापक डॉक्टरांना उन्हाळी सुटी असल्याने तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने दिव्यांग बोर्ड तीन आठवडे बंद राहणार आहे. २४ व ३१ मे रोजी बोर्डात तपासणीची कार्यवाही केली जाणार नसल्याने रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. या दिवशी टोकन वाटप केले जाणार असले तरी देखील रुग्णांनी उन्हात न येता बोर्ड सुरु झाल्यानंतर यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.