Contact Banner

डॉक्टर ममता रोहित म्हात्रे यांच्या धन्वंतरी क्लिनिक चे शानदार उद्घाटन

 

डॉक्टर ममता रोहित म्हात्रे यांच्या धन्वंतरी  क्लिनिक चे शानदार उद्घाटन

डॉक्टर ममता रोहित म्हात्रे यांच्या धन्वंतरी  क्लिनिक चे शानदार  उद्घाटन.


उरण (सुनिल ठाकूर ).नुकताच डॉक्टर ममता रोहित म्हात्रे यांच्या धन्वंतरी  क्लिनिक चे  16 /05/2023रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ पार पडला .उद्घाटक म्हणून डॉक्टर ममता रोहित म्हात्रे यांनी स्वतःच उद्घाटन केले.   

 उद्घाटक प्रसंगी अरुण म्हात्रे ,आकाश मात्रे ,धनाजी म्हात्रे ,विमल हेमंत म्हात्रे, हेमंत परशुराम म्हात्रे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

    डॉक्टर ममता म्हात्रे ह्या मूळच्या नावडे येथील  हेमंत परशुराम म्हात्रे यांची  कन्या आहेत. मुलातच गरीबी असताना देखील त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवले डॉक्टर ममता म्हात्रे मुलातच अभ्यासू वृत्तीच्या होत्या, अभ्यासू व्यतिरिक क्रीडा क्षेत्राची त्यांना खूप आवड आहे. डॉक्टर ममता म्हात्रे यांनी बी एच एम एस (एम यू एच एस)सी जि ओ, सी सी एम,  सी एस व्ही डी , केलं आहे .

      डॉक्टर ममता म्हात्रे यांचे मूळ गाव नावडे. डॉक्टर ममता म्हात्रे यांनी प्राथमिक शिक्षण नावडे गावातूनच घेतले . तदनंतर उच्च माध्यमिक शालेय शिक्षण पनवेल येथे घेतले. डॉक्टर की साठी त्यांना वाय् एम् टी  होमीओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ला जावे लागले .अशाप्रकारे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे रोहित मात्रे यांच्याशी विवाह झाला .परंतु मनाशी एक स्वप्न होते ते म्हणजे स्वतःचे क्लिनिक असावे त्यात त्यांचे पती रोहित म्हात्रे यांनी चांगली साथ दिली. आणि अखेर ते स्वप्न सत्यात उतरवण्यास त्यांनी मदत केली आणि आज ते स्वप्न त्यांचे पूर्ण झाले. आपल्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं आणि आपल्या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांना व्हावा ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.