अखेर शेगावचे अध्यात्मिक केंद्र आनंद सागर भाविकांसाठी सुरू
अखेर शेगावचे अध्यात्मिक केंद्र आनंद सागर भाविकांसाठी सुरू
लेवा जगत न्यूज शेगाव -श्री संत गजानन महाराज यांची समाधी स्थळ संत नगरी शेगाव येथील आनंद सागर हा प्रकल्प महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसापासून आनंद सागर हा प्रकल्प पुन्हा सुरू होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अखेर आनंद सागर सुरू करण्यात आल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. आनंद सागर हे शेगाव येथील मनोहारी उद्यान व ध्यान केंद्र आहे.हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी अध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत, तसेच मत्सलय,तलाव ,ध्यानकेंद्र,फाउंटन रेल्वे गाडी, झुलता पूल तसेच तिथे ध्यान मंदिर आहे. पर्यटनाचा असा योग जोडून आलेला असताना काही कारणाने आनंद सागर प्रकल्प बंद होता. आनंद सागर मुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता .
हेही बघा-राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार व पुस्तिके साठी प्रस्ताव पाठवा,शेवटची मुदत ३१मे२०२३ -लेवाजगत समूहाचे आवाहन >>https://www.lewajagat.com/2023/03/Rastriya-leva-abhiman-puraskara-va-pustikesathi-prastava-pathava-lewajagat-samuhache-avahana.html
दरम्यान आता आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती संस्थानने अधिकृत दिली आहे.संत गजानन संस्थान कडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्ष पासून बंद होते. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत होते.
२००१या वर्षी धार्मिक ,अध्यात्मिक आणि पर्यटक स्थळ म्हणून आनंद सागरची निर्मिती करण्यात आली आहे .आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत होते. दरम्यान आता प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहे अशी माहिती श्री गजानन श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने देण्यात आली आहे.तरी भाविक व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत