Contact Banner

2 हजाराच्या नोटबंदीची तुमच्यासाठी महत्त्वाचीअसणारी ही माहिती..

 

Important-information-for-you-about-2-thousand-denotation

2 हजाराच्या नोटबंदीची तुमच्यासाठी महत्त्वाचीअसणारी ही माहिती..


लेवाजगत न्यूज -30 सप्टेंबरनंतर या नोटांचे काय ? आरबीआयने सांगितलेच नाही


माझ्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत, काय करू? ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्व बँका, आरबीआयच्या १९ विभागीय कार्यालयात नोटा बदलून घेता येतील. त्यानंतर मात्र काय करायचे हे आरबीआयने स्पष्ट केलेले नाही.


• एका वेळी किती नोटा बदलून घेता येतील? दोन हजारांच्या कितीही नोटा बँक खात्यात जमा करता येतील. स्वत:च्या खात्यात ४९,९९९ रु. पॅन कार्डशिवाय जमा करू शकता. पॅन कार्ड लिंक असलेल्या बचत खात्यात एका वर्षात १० लाख रुपये जमा करू शकता. यापेक्षा जास्त असल्यास आयकरची नोटीस येईल. करंट अकाउंटमध्ये पॅनकार्डसह कितीही रक्कम भरू शकता.


• जर २ हजार रुपयांच्या १० पेक्षा जास्त नोटा असतील तर? २००० च्या १० नोटा कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त असल्यास खात्यात जमा होतील.


• सध्या मी बाजारपेठेत या नोटांद्वारे खरेदी करू शकेन का? हो. सध्या २ हजार रुपयांच्या नोटांचा व्यवहारात उपयोग करता येईल. आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वांना बँकेत जमा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.


• जर कुणी २ हजार रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर? २ हजारांची नोट तूर्त वैध आहे. त्यामुळे कुणीही नकार देऊ शकत नाही. एखादी व्यक्ती किंवा दुकानदाराने नकार दिला तर आयपीसीचे कलम ४८९ (ए) ते ४८९ (ई) व करन्सी अॅक्टनुसार एफआयआर दाखल करूशकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.