Header Ads

Header ADS

मणिपूरमध्ये हिंसाचार; आतापर्यंत 40 दहशदवाद्यांचा खात्मा


 मणिपूरमध्ये हिंसाचार; आतापर्यंत 40 दहशदवाद्यांचा खात्मा


 मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. यावेळी दहशदवाद्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष केलं आहे.तसेच दहशदवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 40 दहशदवादी मारले गेल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी दिली आहे.


 ‘निःशस्त्र नागरिकांना दहशतवादी गोळ्या घालत आहेत तसेच त्यांचे घरही जाळून टाकत आहे. मणिपूरला तोडण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या मदतीने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 


मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष :


अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी मैतेई समुदायाने केली होती. त्याच्या निषेधार्थ 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.


 मणिपूरमधील सुमारे 53 टक्के लोकसंख्या मैतेई समुदायाची आहे आणि ते इंफाळ खोऱ्यात राहतात. तसेच आदिवासी - नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.


 एकंदरीत, सध्याच्या या वांशिक संघर्षात 70 हून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मणिपूरला जाणारआहेत, त्यापूर्वीच ही मोठी कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.