दुचाकी झाडावर आदळल्याने चालकाचा मृत्यू ! वावरूळी येथील घटना !
दुचाकी झाडावर आदळल्याने चालकाचा मृत्यू !
वावरूळी येथील घटना !
लेवाजगत न्यूज वरूड :- तालुक्यातील वावरूळी येथील ५६ वर्षीय इसम दुचाकिने नातेवाईका कडून परत येत असताना दुचाकी बोरिच्या झाडावर आदळली. यामध्ये चालकाचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारच्या रात्री नऊ वाजताचे दरम्यान घडली.
पोलीस सूत्रानुसार ,मृत पांडुरंग शंकरराव पांडे (वय ५६ ) रा. वावरुळी असे आहे. मृतक हे दुचाकी (क्र. एमएच २७ एएच ३६६९) ने नातेवाईकांच्या दशक्रियेकरीता नागठाणा शेंदूरजनाघाट येथे गेले होते.
दरम्यान परत येताना उशीर झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत मोबाईल वर संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून फिर्यादी आणि भाऊ शोधण्यासाठी निघाले. तेंव्हा मृतक पांडुरंग पांडे हे वावरुळी गावाचे रोडचे कडेला पडलेले दिसले व गाडी त्यांचे अंगावर पडलेली होती.फिर्यादीने काकाला ग्रामिण रुग्णालय वरुड येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अशी फिर्याद संजय मधुकर पांडे रा. वावरुळी यांनी वरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करुन वरूड पोलिसांनी तपास सुरू केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत