रावेर सभापतीपदाचा तिढा मुंबई दरबारी
रावेर सभापतीपदाचा तिढा मुंबई दरबारी
लेवाजगत न्यूज सावदा- रावेर बाजार समितीच्या सभापती पदाचा फार्मूला महाविकास आघाडी कडून ठरला आहे. पहिले वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेवर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीन उमेदवारांची नावे आघाडीवर होती, यातील मंदार पाटील यांनी माघार घेतल्याने राजेंद्र चौधरी उर्फ राजू ठेकेदार व सचिन रमेश पाटील हे दोघे उमेदवार सभापती पदावर दावे प्रति दावे करीत आहेत.
यात शिवसेना (उबाठा)गट व इंदिरा काँग्रेस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आम्हाला एक उमेदवार द्यावा त्यालाच आम्ही मतदान करू व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठांनी ठरवावे सभापती पद कोणाला द्यावे तर असे सांगितल्याचे कळते आहे.
दोघे उमेदवार आपापल्या उमेदवारीवर अडून बसल्याने शेवटी हा तिढा एकनाथराव खडसे यांच्यामार्फत मुंबई दरबारी पोहोचला आहे. यात अजित दादा पवार व जयंतराव पाटील हे ज्येष्ठ ज्यांचे नाव सांगतील तोच सभापतीपदी विराजमान होणार आहे अजितदादा पवार व जयंतराव पाटील यांचे कडून कोणाच्या नावाला हिरवा कंदील मिळतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. अकरा वाजेपर्यंत ज्येष्ठांचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत