चिखली येथील विहिरीमध्ये जवानाचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय
चिखली येथील विहिरीमध्ये जवानाचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर | शिरपूर (ता. जि. बुलढाणा) बेपत्ता शिवारातील विहिरीत आला आहे. मृतदेह चिखली जवानाचा हॉटेल भाग्यश्री जवळील आढळून भारतीय संदीप शेळके सैन्यात नोकरीत असलेले संदीप शिवाजी शेळके (वय २५) हे दिनांक १३ रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घोडसगाव चिखली तालुका मुक्ताईनगर येथील भाग्यश्री ढाब्यावरून कोठेतरी निघून गेल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आली होती. संदीप शेळके हा त्यांच्या मित्रासोबत चिखली येथे आला होता. दिनांक १५ रोजी मिसिंग व्यक्तीचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह चिखली शिवारातील हॉटेल भाग्यश्री जवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणले असता तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शिवाजी सुकदेव शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी तपासाला गतीने सुरुवात झाली आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत