Contact Banner

रावेर कृऊबा सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच




रावेर कृऊबा सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच

 सावदा प्रतिनिधी:- उद्या दिनांक 17 रोजी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फार्मूला ठरला असून दोन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस दोन वर्ष इंदिरा काँग्रेस व एक वर्ष शिवसेना (उबाठा)गट यांना देण्यात येणार आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा संचालक निवडून आले असल्याने पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालकाला सभापतीपद मिळणार आहे यादरम्यान राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत सभापती पदासाठी मोठी रस्सीखेच  होत आहे.

   रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील असलेले दोन गट सर्वश्रुत आहेत माजी आमदार अरुण दादा पाटील यांचे पुतणे मंदार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील सुपुत्र सचिन पाटील  या दोन्ही गटांनी सभापतीपदावर दावा केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठा संघर्ष दिसायला मिळत आहे. तर अरुणदादा पाटील यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष रेखा चौधरी यांचे पती राजेंद्र चौधरी यांनी देखील सभापती पदावर दावा केला आहे राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील,राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील  या तिघांनी काल एका अपक्ष संचालकाची गुप्त भेट घेतल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे नेहमीच माजी आमदार अरुण दादा पाटील यांच्या यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे सोपान पाटील किशोर पाटील व राजू चौधरी हे नेमके कोणत्या भूमिकेत आहे. आमदार श्री चौधरी माजी आमदार अरुण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना काही धक्का देण्याच्या तर तयारीत नाही ना ? अशा राजकीय चर्चेला मोठे उदान आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.