Contact Banner

सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात दर अमावस्येला होणार प्रवचन


सावदा येथील  श्री स्वामिनारायण मंदिरात दर अमावस्येला होणार प्रवचन



सावदा येथील  श्री स्वामिनारायण मंदिरात दर अमावस्येला होणार प्रवचन 

लेवाजगत न्यूज सावदा -येथील श्री स्वामीनारायण मंदिरात गुजरात येथील वडताल स्वामीनारायण मंदिर संस्थान अंतर्गत कामकाज चालते. वडताल संस्थानचे द्विशताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्त सावदा येथील मंदिरात गेल्या सहा महिन्यांपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर अमावस्येला मंदिरात  रात्री ७ ते ८ भजन, प्रवचन व प्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शास्त्री भक्तीप्रकाशदास यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदास यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

  तरी भाविक भक्तांनी रात्री होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे  असे आवाहन मंदिर ट्रस्टी ने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.