सावद्यातील मुस्लिम समाजातील तरुणांनी हरणाला दिले जीवदान
सावद्यातील मुस्लिम समाजातील तरुणांनी हरणाला दिले जीवदान
लेवाजगत न्यूज सावदा- येथील मुस्लिम समाजाच्या तरुणांनी कुत्र्यांनी केलेल्या - हल्ल्यातून हरणीला वाचवून जीवदान दिले. तिला नवविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री दोन ते सव्वादोन वाजेच्या • सुमारास पांढरी या शेतातील भागातून एक हरणी पळत पळत येऊन गावात आली. तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने ती जीव घेऊन पळत होती. या वेळी अचानक गटारीत पडली. शहरात वीज बंद असल्याने हाजी अख्तर हुसेन मेकॅनिक सय्यद जुबेर दरवान, शेख साहिल शेख बाबू हे युवक घराच्या बाहेर रस्त्यावरती बसले होते. त्यांनी हरणीला पकडून आपल्या मोठा आखाडा भागातील वाड्यात आणले. तेथे आणल्यावरती त्यांनी
वनविभागाशी संपर्क साधला व पोलिसांना माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना रात्री या हरणीला आपल्या घरात सुरक्षित ठेवा आपण सकाळी उपचार करू असे सांगितले. सकाळी शहरातील गुरांच्या दवाखान्यातील डॉ. निलेश राजपूत यांनी त्या घायाळ हरणीवर उपचार केले. तिला आठ टाके मारावे लागले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आले व त्यांनी रावेर येथे या हरणीला घेऊन वनात सुरक्षित सोडले. या युवकांनी हरणीला कुत्र्यांच्या ताब्यातून सोडून वन विभागाच्या हवाली केले. तसेच पोलिसांना माहिती दिल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत