सावद्यात उन्हाची धग: प्रवासी बस स्थानकात पंख्या विनाच
सावद्यात उन्हाची धग: प्रवासी बस स्थानकात पंख्या विनाच
लेवाजगत न्यूज सावदा-येथून रावेर ते जळगाव, भुसावल, सुरत, नाशिक, कल्याण, पुणे, यावल, चोपडा, बऱ्हाणपूर या बस ये जा करतात. महिलांना तिकिटात ५० टक्के सूट मिळाल्याने प्रवासात महिलांची संख्या वाढत असून त्याच बरोबर प्रवासी संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. लग्नसराई, उन्हाळ्याची सुटी असल्याने प्रवाशी संख्या वाढत आहे. उन्हाळा असल्याने उन्हाची धग असून सुद्धा प्रवासी आता एसटी बसची वाट पाहू लागले आहे. या उन्हाच्या धगधगीत एसटीची वाट पहात बसणारे प्रवासी मात्र आपला घाम गाळत बस स्थानकावर बसतात. त्यांच्या डोक्यावरती सिलिंग फॅन असून सुद्धा ते बंद अवस्थेत आहे. आतापर्यंत हे पंखे सुरू झालेले नाहीत. पंखे उन्हाळ्यात तरी सुरू ठेवावे व प्रवाशांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत