रावेर बाजार समितीच्या सभापती पदाचा फार्मूला आज ठरणार
रावेर बाजार समितीच्या सभापती पदाचा फार्मूला आज ठरणार
लेवाजगत न्यूज सावदा -२९ एप्रिल रोजी बाजार समितीचा निकाल हाती आला तेव्हा महाविकास आघाडीने रावेर बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. १८ पैकी १३ जागा काबीज केल्या तर अपक्ष दोन व भाजपा अधिकृत पॅनल ला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते .बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील व रमेश पाटील यांनी अतिशय कुशल रणनीती करत रावेर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे.
दिनांक १७ मे रोजी रावेर बाजार समितीचा सभापती पदाची निवडणूक पार पडत आहे .या निवडणुकीसाठी फार्मूला आज आमदार शिरीष चौधरी माजी आमदार अरुण दादा पाटील व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील या तिघा प्रमुखांच्या बैठकीत किती वर्ष कोणत्या पक्षाचा सभापती करायचा असा फार्मूला ठरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिले आहे.
असे मिळू शकते सभापती पद
रावेर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहा जागा, इंदिरा काँग्रेस पाच जागा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला दोन जागा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन वर्ष, इंदिरा काँग्रेस दोन वर्ष व शिवसेना उबाठा गट एक वर्ष अशा फॉर्मुल्याची रावेर तालुक्यात चर्चा चालू आहे. त्यामुळे आ. शिरीष चौधरी मा. आ. अरुणदादा पाटील व शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांच्या बैठकीत निर्णय होणार असून पहिल्यांदा सभापती पदाची माळ कोणत्या पक्षाच्या गळ्यात पडते त्यामुळेच बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ही नाव आहे सभापती पदासाठी चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे माजी आ.अरुण दादा पाटील यांचे पुतणे स्व. मनोहर दादा पाटील यांचे सुपुत्र मंदार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे सुपुत्र सचिन पाटील, इंदिरा काँग्रेस तर्फे मनीषा सोपान पाटील व पंकज राजीव पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे स्वतः योगीराज पाटील या नावांची चर्चा आहेत.
आज संध्याकाळी पाच वाजता अज्ञात स्थळावर महाविकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांची सभापतीपद निवडीसाठी बैठक आयोजित केल्याचे वृत्त आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत