वरूड तालूक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचा-यांची अनुउपस्थिती ठरत आहे नागरिकांची डोकेदुखी
वरूड तालूक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचा-यांची अनुउपस्थिती ठरत आहे नागरिकांची डोकेदुखी
सुशिल बेले यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार कारवाई करण्याची केली मागणी
लेवाजगत न्युज वरुड:-
वरुड शहरातील व संपूर्ण तालूक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळातच अनउपस्थित राहत असल्याने जन आक्रोश संघटनेचे संस्थापक सुशिल बेले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून अशा कामचुकारपणा करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे कि राज्यसरकारने सन् २०१९ पासुन कार्यालयीन वेळ व पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे.असे असताना देखील सर्वच कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत ९.४५ मध्ये उपस्थीत राहत नाही व ६.१५ या वेळेपर्यंत कोणीच अधिकारी व कर्मचारी आपली उपस्थिती दर्शवित नाही.शासन नियमाप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा झाला तेव्हा पासून कर्मचारी व अधिकारी या दोन दिवसीय सुट्टीचा लाभ घेत आहे. वरुड तालुक्यातील सर्वच
कार्यालयामध्ये कोणीच अधिकारी व कर्मचारी आपली उपस्थिती वेळत दर्शवित नाही.या मध्ये वरुड व शे.घाट नगरपरिषद कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पाटबंधारे विभाग कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, तालुक्यातील तलाठी कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये व तालयातील समस्त शासकीय कार्यालये येथे वेळा प्रमाणे ९ वाजुन ४५ मी. कोणतेच अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थीत राहत नाही. त्यांच्या कार्यालयात येण्याची वेळ अंदाजे १०.३० ते ११.३० वाजताचा असते व दुपारी १:३० मी. जेवनाकरीता गेलेले कर्मचारी व अधिकारी जवळपास दिड ते दोन तास बाहेरच असतात. तसेच
४.३० वाजेपर्यंत पर्यंत तालुक्यातील सर्वच कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी कार्यालयातून निघून जातात या मुळे शहरातील व तालुक्यातील नागरीकांना कार्यालयीन कामाकरीता सतत चक्रा माराव्या लागत आहे. या मुळे येथील नागरीकांना आर्थिक भुर्दड व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.कृपया या कार्यालयांवर लक्ष ठेवण्या करीता कुठल्या नियमावलीचा तात्काळ वापर करून येथील अधिका-यांवर व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत