Contact Banner

विहिरीत मृतदेह आढळलेल्या महिलेचा खून; एकास अटक

Vihirīta-mr̥tadēha-āḍhaḷalēlyā-mahilēcā-khūna;-ēkāsa-aṭaka

 

विहिरीत मृतदेह आढळलेल्या महिलेचा खून; एकास अटक 

लेवाजगत प्रतिनिधी | यावल तालुक्यातील हिंगोणा येथे धरण परिसरात शेत विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले होते. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. मृत महिला मध्य प्रदेशातील रहिवासी होती. ती तरुणासोबत राहण्याचा हट्ट धरत असल्याने त्या तरुणाने तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हिंगोणा (ता. यावल) येथे दि. ८ मे रोजी मोर धरण परिसरात असलेल्या साबीर खान शब्बीर खान यांच्या शेत गट क्र. १२०२ मधील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका ४० वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करून यावल रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदनात महिलेची हत्या झाल्याचा उलगडा झाला. फैजपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करीत या महिलेची ओळख पटवली व ती संशयित खुमसिंग सरदार बारेला (वय ३३, रा. खिरवड, ता. रावेर, हल्ली मुक्काम मोर धरणाजवळ, हिंगोणा), यांच्या सोबत पाहिली गेली होती, तेव्हा पोलिसांना त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता महिलाही आपल्या सोबत राहण्याचा हट्ट धरत होती. तू तुझ्या घरी निघून जा, तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, मात्र महिला ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने दिनांक २८ एप्रिल रोजी मध्यरात्री धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार करून तिला विहिरीत ढकलून दिले होते, अशी कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी तरुणास अटक केली आहे. पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.