Header Ads

Header ADS

जळगाव मनपाची प्रभाग कार्यालये शनिवारसह रविवारीही सुरू

Jalgaon-Manpachi-Ward-Offices-Saturday-including-Sunday-Starting


जळगाव मनपाची प्रभाग कार्यालये शनिवारसह रविवारीही सुरू 

लेवाजगत प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिकेने मालमत्ता कराचा आगावू भरणा करण्यांना दहा टक्के सुट जाहीर केली आहे. या योजनेची अंतिम मुदत ३१ मे आहे. त्यामुळे नागरीकांना कराचा भरणा करता यावा यासाठी शनिवार व रविवारी दोन दिवस प्रभाग कार्यालये सुरू राहणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत दहा टक्के सुट मिळविण्यासाठी १४ हजार ४१३ मालमत्ताधारकांनी भरणा केला आहे. या मिळकतधारकांनी तब्बल १४ कोटी रूपयांचा भरणा केला आहे. महापालिकेत भरणा करण्यासाठी दोन हजार रूपयांच्या कितीही नोटा जमा करता येणार आहेत. दोन हजाराच्या नोटांसाठी कोणतीही मर्यादा नसल्याचे पालिकेचे उपायुक्त गणेश चाटे यांनी कळवले आहे. गेल्या चार दिवसांत दोन हजाराच्या एकूण ८५० नोटा महापालिकेत जमा झाल्या आहेत असे सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.