आजोबा सोबत तलावाजवळ गेलेल्या दोन नातीचा बुडून मृत्यू
आजोबा सोबत तलावाजवळ गेलेल्या दोन नातीचा बुडून मृत्यू
वृत्तसंस्था सुरगाणा -आजोबांसोबत जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या दोन नातींचा आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला. हातरुंडी येथे सोमवारी (दि. १५) ही घटना घडली.
भावना भागवत गावित (वय ८, सुभाषनगर, डोल्हारे) व रेणुका परशराम भोये (वय ६, रा. सोनगीर, ह. मु. हातरुंडी) अशी या दोन मुलींची नावे आहेत. भावना दुसऱ्या इयत्तेत तर रेणुका बालवाडीला होती.
आजोबा सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान दोन्ही नातींना घेऊन जनावरांना पाणी पाजण्यासाठी दरी तलावाजवळ गेले होते. यावेळी दोन्ही नाती तलावात आंघोळ करत होत्या. आजोबा जनावरांना पाणी पाजल्यानंतर शेताकडे परत आले होते. १५ ते २० मिनिटे झाली तरी दोन्ही नाती परत आल्या नाही. त्यामुळे त्यांनी दरी तलावाकडे धाव घेतली. परंतु, नातींचे कपडे तलावाबाहेर दिसताच आजोबा चिमणा भोये यांनी तलावात उडी घेत दोन्ही नातींना तलावातून बाहेर काढले. परंतु, दोघींचाही मृत्यू झाला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत