Contact Banner

न्यायालयाचा निर्णय येईपर्यत ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले

वृत्तसंस्था छत्रपती संभाजी नगर -राज्य शासनाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले. त्यानंतर काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, नामांतराचे प्रकरण न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत.

    औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आहे. शिवाय राज्य शासनाने नामांतराबाबत आक्षेप मागवले होते. त्यावर सुनावणी सुरू आहे. तरीही महसूल व इतर विभागांशी संबंधित कार्यालयांची नावे बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयांनी औरंगाबाद नावात बदल करू नये. उच्च न्यायालयाच्या २० एप्रिल २०२३ रोजीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.