Header Ads

Header ADS

अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंनी अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Adhikr̥uta-āntararāṣhṭrīya-spardhāmmadhyē-sahabhāgī-khēḷāḍūnnī-arthasahāyyāsāṭhī-arja-karaṇyāchē-āvāhana


 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंनी अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 8 -: राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक व्हावे, राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावे, याकरीता क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. 

Adhikr̥uta-āntararāṣhṭrīya-spardhāmmadhyē-sahabhāgī-khēḷāḍūnnī-arthasahāyyāsāṭhī-arja-karaṇyāchē-āvāhana


  या अंतर्गत राज्यातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. या योजनंतर्गत 14 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश, विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे, गणवेश इत्यादीसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

  या योजनेतंर्गत ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चैम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चैम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या 14 स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे.

  ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ/क्रीडा प्रकार इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद आहे.

  तरी या विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. 

  अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in ,

 sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क करावा, असे चंद्रकांत कांबळे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकात कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.