Contact Banner

डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्यमंत्रा व्हाट्स अ‍ॅप सेवेचा शुभारंभ

 

डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्यमंत्रा व्हाट्स अ‍ॅप सेवेचा शुभारंभ 

लेवाजगत न्युज जळगाव: - आषाढी एकादशी व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते आज आरोग्यमंत्रा या व्हाट्स अ‍ॅप सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेच्या माध्यमातून दैनंदिन आरोग्याशी निगडीत माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचवून आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील आवश्यक सेवांविषयीची माहिती देखिल या सेवेच्या माध्यमातून पोहोचविली जाणार आहे.  

 आरोग्यमंत्रा या व्हाट्स अ‍ॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करून समूहात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. या सेवेच्या शुभारंभप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, कंटेट ओशन प्रा. लि.चे संचालक डॉ.युवराज परदेशी, तुषार भांबरे, रजत भोळे यांच्यासह वैद्यकिय महाविद्यालयाचे तालुका समन्वयक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.