Header Ads

Header ADS

रेल्वे स्थानकावर थांबलेल्या युवतीवर अत्याचार दोन नराधमास अटक

 

Atrocity-two-murder-arrest-on-girl-stopped-at-railway-station

रेल्वे स्थानकावर थांबलेल्या युवतीवर अत्याचार दोन नराधमास अटक 

वृत्तसंस्था नाशिक -नवसारी येथून नाशिकमधील आपल्या बहिणीकडे रेल्वेने आलेल्या परंतु, मध्यरात्र झाल्याने रेल्वेस्थानकावर एकटी थांबलेल्या एका असहाय्य विवाहित तरुणीला दोघांनी फसवत चेहडी शिव परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवत दोघाही संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी एक रेल्वे स्थानकावरील पाणी विक्रेता तर दुसरा रिक्षाचालक आहे.

Atrocity-two-murder-arrest-on-girl-stopped-at-railway-station


   नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित विवाहित तरुणी ही १९ वर्षाची असून ती नवसारी येथून मुंबईमार्गे नाशिकला आपल्या बहिणीकडे रेल्वेने आली होती. बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास ती नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर तिने सहप्रवाशाच्या मोबाइलवरून बहिणीला फोन केला. मात्र खूप रात्र झाली असल्याने तू आता येण्याची घाई करु नकोस रेल्वेस्थानकावरच थांबून रहा. सकाळी तुला मी घेण्यास येते असे बहिणीने तिला सांगितले. त्यामुळे पीडितेने कुठलाही धोका न पत्करता रेल्वेस्थानकावरच थांबण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान रेल्वे स्थानकावरील पाणी विक्रेता कुणाल पवार याने मदतीचा बहाणा करत तिची विचारपूस केली व तिला जेवणासाठी खाद्यपदार्थ दिले.काही वेळात त्याने आपला रिक्षा चालक मित्र प्रकाश मुंडे यालाही बोलावून घेतले. पीडितेची दिशाभूल करुन दोघांनी तिला फसवत चेहडी शिव परिसरात नेले व तेथील एका पेरूच्या बागेत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मारहाण करून कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. यावेळी तरुणीने प्रतिकार करत तेथून पळ काढत आरडाओरड केली. त्यावेळी शेजारील एका इमारतीमधील सुरक्षारक्षकाच्या मदतीने तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

    नाशिक रोड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडितेकडून आरोपींची माहिती घेत गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवत दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक हांडोरे तपास करत आहेत.

    संशयितांना आज कोर्टात करणार हजर

या गुन्ह्यातील दोघाही संशयित आरोपींची नाशिकरोड पोलिसांनी कसून चौकशी केली असून त्यांना उद्या (दि.२३) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.