Header Ads

Header ADS

येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने गोवंश हत्या कायद्याची बंदी कायद्याची योग्य अंमलबजावणी व अवैध गोवंश वाहतूक बंद करा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तर्फे सावदा पोलीस स्थानकात निवेदन


 येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने गोवंश हत्या कायद्याची बंदी कायद्याची योग्य अंमलबजावणी व अवैध गोवंश वाहतूक बंद करा


विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तर्फे सावदा पोलीस स्थानकात निवेदन

लेवाजगत न्युज सावदा:-येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने सावदा पोलीस स्थानकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तर्फे निवेदन देण्यात आले , गोवंश हत्या बंदी कायद्याची योग्य अंमलबजावणी होऊन अवैध गोवंश वाहतूक बंद करावी. कायद्याचा भंग करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे व कायदा पालनाचा आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यावर होणाऱ्या चुकीच्या कारवाई बंद व्हाव्यात.

https://www.lewajagat.com/2023/06/Close-the-appropriate-rules-and-codes-of-the-ban-on-cattle-slaughter-bans-on-the-occasion-of-Bakri-Eid


   कायदा पालनाचा आग्रह हा गुन्हा नसून त्याच्या पालनासाठी आग्रह करणे हा कोणत्याही भारतीय नागरिकांचा संवैधनिक अधिकार आहे. तसेच कत्तली साठी गोवंशाच्या पुरवठ्याच्या साठी पूरक असणारे वातावरण आपल्या शहरात परत तयार होत आहे.

  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात परत गुरे आठवडा भर राहणे सुरू होत आहे. ते नियम बाह्य असल्याने त्याला प्रतिबंध करावा व आमच्या कायदा पालनाच्या आग्रहास योग्य न्याय द्यावा.

आमच्या योग्य अश्या कायदे पालनाच्या आग्राहास प्रशासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यास संवैधानिक आंदोलनाचा आमचा मार्ग खुला आहेच.असे निवेदन जिल्हा गो रक्षा प्रमुख चंदन इंगळे,रावेर प्रखड संयोजक केतन पाटील,निर्मल महाजन,साहिल चौधरी,निखील भिडे,विशाल परदेशी, वैभव वाघूलदे,सागर चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.