आमोदा येथून वरदळीच्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी
आमोदा येथून वरदळीच्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी
लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल- भुसावल फैजपूर रस्त्यावरील न्हावी विरोदा रस्त्याच्या चौफुली वरून बांधकाम करणाऱ्या मजुराची मोटरसायकल दि १९ रोजी चोरीस गेल्याची घटना घडली
सदरहून रईस पिंजारी हे मिस्तरी बांधकाम करून आपला उदरनिर्वाह करतात ते भुसावल फैजपूर रोडवरील चौफुलीवर फिरोज तडवी यांच्या घराच्या बांधकाम करीत असताना त्यांची चौफुली वरील पाण्याच्या टाकीजवळ स्वतःच्या मालकीची लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एस ७०८३ ही दिनांक १९/६/२०२३ वार सोमवार रोजी बांधकाम करण्याआधी सकाळी तेथे लावली होती जेव्हा संध्याकाळी काम संपले तेव्हा घरी जाण्यासाठी गाडी पाहिली तर तेथे नव्हती तेव्हा त्यांनी शोध घेतला असता त्यांची मोटरसायकल न सापडल्याने तिला अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले न्हावी व विरोदा रस्त्यावरील चौफुली हा वरदळीचा परिसर आहे तेथून मोटरसायकल चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याआधी असेच भालोद येथील रहिवासी कामानिमित्त आमोदा येथे आले असता खळवाडी प्लॉट मधून त्यांची सुद्धा मोटरसायकल चोरीस गेल्याने ही आमोदा येथील दुसरी घटना असून या घटनेची फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाळू भोई तपास करत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत