उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
लेवाजगत न्यूज जळगाव, दि२७- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, चंदुलाल पटेल,जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत