Contact Banner

तलाठी कार्यालयात दोन तलाठी आणि एका कोतवालाला अतिरेक्यांनी ठेवले ओलीस ! चार अतिरेकी पोलिसांनी केले जेरबंद ! नागरिकांमध्ये दहशत ! मॉक ड्रिल झाला यशस्वी !


 तलाठी कार्यालयात दोन तलाठी आणि एका कोतवालाला अतिरेक्यांनी ठेवले ओलीस ! चार अतिरेकी पोलिसांनी केले  जेरबंद ! नागरिकांमध्ये दहशत !  मॉक ड्रिल झाला यशस्वी !


लेवाजगत न्युज वरुड :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तलाठी कार्यालयात  चार अतिरेक्यांनी खंडणीची मागणी करून तिघांना  ओलीस ठेवले. माहिती वरुड पोलिसांना मिळताच मंगळवार दुपारी चार वाजता वरिष्ठ अधिकऱ्यासह पोलिसांचे बचाव पथक दाखल होऊन चार अतिरेक्याना बेड्या ठोकण्यात यश येऊन ओलीस ठेवलेल्यांची सुखरूप सुटका केली. यावेळी नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

 पोलिसांचा मॉक ड्रिल असल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने  मंगळवारला  दुपारी  चार वाजता शहरातून पोलिसांचा ताफा, सुसाट जाताना दिसताच नागरिकांमध्ये चर्चेला पेव फुटले, शेकडो पोलिस आणि दहा वाहनाचा ताफा वेगाने बाजार समितीच्या आवारात शिरला. 


 तलाठी कार्यालयाला वेढा दिलेले क्यू आर टी दलाचे जवान आणि जीव धोक्यात घालून पोलीस कमांडो थेट एका एकाला कव्हर करीत दरवाजा तोडून आत शिरले तेंव्हा दोन तलाठी आणि एका कोतवालाला ओलीस ठेवणारे चार अतिरेकी खंडणीची मागणी करीत होते.  याच वेळी पोलिसांनी चौगहाण जेरबंद करून बेड्या ठोकण्यात यश आले.

  हा मॉक ड्रिल असल्याचे सांगताच नागरिकांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी एसडीपीओ निलेश पांडे , ठाणेदार प्रदीप चौगावकर,मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे,शेंदूरजना घाटचे सतीश इंगळे,बेनोडाचे स्वप्नील ठाकरे,एपीआय दीपक मडावी,दीपक दळवी सह पोलीस अधिकरी कर्मचारी ,रुग्णवाहिका,अग्निशमन दल ,श्वान पथक,बॉम्ब शोधक नाशक, क्यू आर टी,आरसीपी पथकाने रंगीत तालीम केली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.