Header Ads

Header ADS

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्काकरिता अर्ज करण्याचे आवाहन

 

Divyāṅga-vyaktī-va-sansthānnī-rāṣṭrīya-puraskākaritā-arja-karaṇyāchē-āvāhana

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्काकरिता अर्ज करण्याचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. २१केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्ती व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्ज गृह कामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टलवर (www.awards.gov.in) केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. 

Divyāṅga-vyaktī-va-sansthānnī-rāṣṭrīya-puraskākaritā-arja-karaṇyāchē-āvāhana


    सदरचे अर्ज / नामांकन मागविण्याच्यादृष्टीने दिनांक १५ जून ते ३१ जुलै, २०२३ या कालावधीकरिता संकेत स्थळ उघडले आहे. राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ या करिता अर्ज / नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या (URL) www.awards.gov.in) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या दिव्यांग व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार या बाबतच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केलेले आहेत. 

    तरी जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व संस्था यांनी विहित कालावधीत दिनांक ३१ जुलै २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन विजय रायसिंग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.