पुसला येथील दोन अनाथ बहीनींना मिळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवण गौरव पुरस्कार
पुसला येथील दोन अनाथ बहीनींना मिळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवण गौरव पुरस्कार
लेवाजगत न्युज वरूड:- अनेकजण नियतीशी संघर्ष करता करता मेटकुटीस येतात. यातून महिलांशी सुटल्या नाहीत. त्यांनाही असहनीय चटके सोसत संघर्ष करावा लागतो. यातून पुढे गौरवा स्पद कार्य त्यांच्या हातुन जेव्हा घडते, तेव्हा त्यांची दखल समाजसेवी संस्था घेतात. अशीच दखल वरुड तालुक्यातील पुसला गावातील दोन बहिणीची घेतल्या गेली.
नागपूर येथील "कॉस्ट्राइब महासंघाच्या विभागीय मेळावा रविवार दि.28 मे. रोजी अर्पण सभागृह, हिंदी मोरभवन बर्डी, नागपूर येथे आयोजित होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुण गाडे (कॉस्ट्राईब महासंघ ) उदघाटक मा. सौम्या शर्मा IAS (मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद नागपूर ), मा. विपुल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. P. नागपूर, स्वागतांध्यक्ष माँ. यशवंत माटे व सीताराम राठोड सूत्रसंचालक होते.
सुशीला व बेबी बीडकर हे यां भगिनीचे नाव आहे. वडील व्यसनी असल्यामुळे त्यांना घरच्या परिस्थिती शी दोन दोन हात करावे लागले. शिकून नोकरीं करून उडरनिर्वाह करण्याचे वय असताना आईवडील गेले. वडिलोपार्जित 4 एकर शेती गावापासून 10 किलोमीटर लांब पंढरी जंगलात, दररोज शेतात पायी जाने येणे करावे लागते. ओलितासाठी रात्री बेरात्री जाऊन ओलीत करणे. यात हिंस्त्र पशुची भीती, मुलीची जात असल्याने लोफर प्रवृतिशी संघर्ष वाट्याला आला.. यातून खुप संघर्ष सोसावा लागला. त्यांची आपबिती ऐकताना अक्षरक्ष : अंगावर शहारे येतात. आजही दृस्ट प्रवृतिशी सामना करावा लागतो.
यां भगिनीच्या संघर्षाची दखल नागपूर येथील यश्वस्वी सामाजिक संस्थेने घेऊन मुलींच्या घरी भेट दिली. मायाताई पाटील, डॉ. मनीष वानखडे सर, पतिभा ताई पाटील, सुनंदा ताई गायकवाड , अरविंद दादा पाटील, प्रवीण दादा कांबळे हे बीडकर भगिनी कडे घरी तसेच शेतात भेट देण्यास आले. व महाराष्ट्र राज्य कॉस्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ यां संघटनेने मुलींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गौरव पुरस्कार 2023देऊन गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत