Header Ads

Header ADS

अक्षय भालेराव हत्या प्रकरणात ! शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !

 

In Akshay-Bhalerao-murder-case!-Shahu-Ambedkar-Social-Organization-Statement-to-Tehsildar!

अक्षय भालेराव हत्या प्रकरणात ! शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन  !

लेवाजगत न्युज वरुड :- नांदेड जिल्ह्यातील बोढर हवेली या गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली.या घटनेचा निषेध म्हणून फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे वतीने निषेध केला. तर तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करून कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवेदनानुसार,नांदेड जिल्ह्यातील बोढर हवेली या गावातील बौद्ध धर्मीय तरुण अक्षय श्रावण भालेराव या तरुणाने गावकऱ्यासह १४ एप्रिलला पहिल्यांदा भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली होती.

In Akshay-Bhalerao-murder-case!-Shahu-Ambedkar-Social-Organization-Statement-to-Tehsildar!


         या कार्यक्रमाचा द्वेष मनात ठेऊन ६ जूनच्या सायंकाळच्या सुमारास जातीयवादी मानसिकतेतून ९  माथेफिरुनि अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या केली. 

 या घटनेतील ८ आरोपीना अटक केली असून एक फरार आहे.सदर घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून दलितांना पोलीस संरक्षणाची गरज असल्याचे नमूद करून या घटनेतील आरोपीना कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणारे निवेदन फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे वतीने तहसीलदार यांना देऊन  निषेध केला.

 तर शहीद अक्षय भालेराव यांचा त्या गावात पुतळा उभारावा अशी मागणी केली.यावेळी फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे सुशील बेले,गजानन ब्राह्मणे प्रा.कमलनारायण उईके,ऍड.योगेश नागले,राजू गायकी,महेंद्र हरले, भीमराज नागले,मनोज बागडे,राहुल घोरपडे,सुनील डोंगरे , सुदर्शन सोमकुंवर,सागर हरले,आकाश कुकडे, राज नागले, मिलिंद वानखडे,संजय पाटील,स्वप्नील बर्डे,सतीश मेश्राम ताहीर खान,निलेश ब्राह्मणे,दिनेश काटे,श्रीपत रंगारी,सुशील शेळके,गोपाळ मनोहर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.