विंधणे येथील बी. एस. पाटील इंग्लिश मिडीयम शाळेचे शानदार उदघाटन.
उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर -ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच वेळेची बचत व माफक फी या उद्देशाने विंधणे येथील कैलास बंडु पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावे निसर्ग रम्य अशा वातावरणात इंग्लिश मिडीयम ची शाळा बांधली. नुकताच या शाळेचा शानदार उदघाटन सोहळा पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विंधणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माननीय सौ. निसर्गा रोशन डाकी ,माननीय श्री नरेश शेठ घरत सभापती पंचायत समिती उरण ,वाईड मरीन सर्विसेस चे डायरेक्टर माननीय श्री विशाल म्हात्रे सर उपस्थित होते. तसेच विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी हजर होते.यामध्ये माननीय श्री पी. बी. पाटील ,माननीय श्री नरेश पाटील, सदस्य पंचायत समिती सौ. दिशा पाटील.सदस्या ग्रामपंचायत विंधणे सौ. लक्ष्मी पाटील,किसन पाटील, सीकेटी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील सर, अशोक पाटील सर, डॉक्टर सुभाष घरत सर, बी. एम. ठाकूर , छत्रपती शिवाजी हायस्कूलचेमुख्याध्यापक श्री अरुण घाग, श्री प्रमोद शेळके, श्री क्रांती जोशी, सुरेश पाटील ,श्री संजय केणी ,रवींद्र कडू, श्री संदेश पणदेरे, परेश म्हात्रे ,श्री मिनिश कड,ू श्री वामनशेठ पाटील ,श्री मधुकर नवाळे ,माननीय मधुकर पाटील , वाय. बी.पाटील, माननीय संदीप माळी , आदी सह एस एस सी बॅच 1990 चे मित्र परिवार अविनाश पाटील,संदीप माळी,सुनिल पाटील,कैलास ठाकूर,प्रवीण पाटील,नरेश पाटील,वामन पाटील,पत्रकार सुनिल ठाकूर आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शाळा ही केबी पाटील एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री कैलास बंडू पाटील यांनी सुरू केलेले असून यामागे विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण देणे हा असूनही शाळा निसर्गाच्या सानिध्यात असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास देखील लाभदायक ठरणार आहे तसेच यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासात होणाऱ्या हाल वाचणार आहेत अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष व सदस्य माननीय श्री कैलास पाटील माननीय श्री गीतेश जोशी ,माननीय श्री सचिन जोशी , माननीय श्री प्रदीप शेळके, माननीय श्री समाधान अस्वले यांनी दिलेली आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. माधुरी कैलास पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन सौ. सौ. रंजना केणी यांनी करून कार्यक्रमाचे आभार संजय केणी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत