Header Ads

Header ADS

पालकमंत्री मंत्री पाटील यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल,आमदार एकनाथ खडसे यांची न्यायालयात हजेरी

Claim-filed-for-damage-against-guardian-minister-Minister-Patil-,-Amdar-Eknath-Khadse-appearance-in-court


 पालकमंत्री मंत्री पाटील यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल,आमदार एकनाथ खडसे यांची न्यायालयात हजेरी

लेवाजगत न्यूज जळगाव-निवडणुकीच्या प्रचारात माजी पालकमंत्री आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांच्या विरोधात शिवसेनेचे नेते विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आमदार खडसे हे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. दिवाणी सत्र न्यायालय वरिष्ठस्तर न्यायाधीश नायगावकर यांच्या दालनात सोमवारी खडसेंनी दाखल केलेल्या शपथपत्राची पडताळणी झाली. मंगळवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Claim-filed-for-damage-against-guardian-minister-Minister-Patil-,-Amdar-Eknath-Khadse-appearance-in-court


    जळगावसह इतर बाजार समितींच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणातून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांवर जिल्हा दूध संघ व जिल्हा बँकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करण्याचे आवाहन आमदार खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले होते. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता; परंतु निवडणुकीमुळे त्याला हजर राहू शकले नव्हते.

    आता हा दावा जळगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला. खडसे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रकाश पाटील यांनी शुक्रवारी तीन लाखांच्या स्टॅम्प ड्यूटीसह शपथपत्र दाखल केले. त्यानंतर अॅडव्हान्स कॉपी देण्यात आल्या. सोमवारी आमदार खडसे न्यायालयात हजर झाले. या वेळी शपथपत्राची पडताळणी करण्यात आल्याचे त्यांचे वकील अॅड. पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्यातर्फे अॅड. सुनील बागुल हे काम पाहत आहेत. दरम्यान, या दाव्याची मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.