Header Ads

Header ADS

"मी स्वतः आत्महत्या करत आहे" कोणाला जबाबदार धरू नका मुलीची सुसाईड नोट

 

"मी स्वतः आत्महत्या करत आहे" कोणाला जबाबदार धरू नका मुलीची सुसाईड नोट

लेवाजगत न्युज जळगाव : जळगाव शहरात एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून तिच्या पालकांची माफी मागितली. तिने लिहिले की, "मी स्वतः आत्महत्या करत आहे. कोणाला जबाबदार धरू नये."


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रौनक कॉलनीत शुक्रवारी ही घटना घडली. कोमल वसंत भावसार असे मृत तरुणीचे नाव असून ती 30 वर्षांची होती. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून सुसाईड नोट, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.


कोमल ही जळगाव शहरातील रौनक कॉलनीत कुटुंबासह राहत होती. ती बँकेत कामाला होती. तिची आई आणि भाऊ पुण्यात राहतात, तर तिचे वडील, जे इलेक्ट्रिशियन आहेत, शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेले. त्यानंतर कोमल कामावर न जाता घरी एकटीच राहिली. यादरम्यान तिने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, तिचे वडील कामावरून घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि त्यांची मुलगी गळफ़ास घेऊन लटकलेली दिसली. त्यांनी मदतीसाठी आक्रोश केल्याने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना हे कळताच त्यांनी घटनास्थळ जाऊन तपास सुरू केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.