Header Ads

Header ADS

स्वामी समर्थ केंद्रात मनमानी कारभार? बरखास्त ट्रस्टचे सदस्य काम पाहत असल्याचा आरोप

स्वामी समर्थ केंद्रात मनमानी कारभार? बरखास्त ट्रस्टचे सदस्य काम पाहत असल्याचा आरोप

 

स्वामी समर्थ केंद्रात मनमानी कारभार? बरखास्त ट्रस्टचे सदस्य काम पाहत असल्याचा आरोप

वृत्तसंस्था जळगाव -शहरातील प्रतापनगर येथील स्वामी समर्थ ‎ केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू अाहे. तेथे ‎बरखास्त झालेल्या ट्रस्टचे दोन सदस्य‎ मनमानी कारभार पाहत आहेत. तेथे श्री‎ स्वामी समर्थ सेवा अाध्यात्मिक व‎ सांस्कृतिक केंद्र, जळगाव असा स्वतंत्र‎ ट्रस्ट असतानाही घटनेप्रमाणे गेल्या ३०‎ वर्षांपासून मनमानी कारभार सुरू‎ असल्याची माहिती सेवा केंद्राचे सभासद‎ नितीन चव्हाण, मधुकर पाटील, रवींद्र‎ कदम यांनी रविवारी पद्मालय विश्रामगृहात‎ झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.‎

Swami-Samarth-Centre-Arbitrary-Management?-Allegation-of-Sacked-Trust-Working-Members-


    प्रतापनगर येथे सन १९८८मध्ये श्री स्वामी‎ समर्थ सेवा अाध्यात्मिक व सांस्कृतिक‎ केंद्र, जळगाव या नावाने स्वतंत्र ट्रस्ट‎ स्थापन करण्यात आले. हा ट्रस्ट स्वतंत्र‎ असून, कोणत्याही न्यासाशी,‎ सभासदत्वाचा, कार्यभाराचा किंवा‎ आशीर्वादाचा असा कोणताही संबंध नाही.‎ ट्रस्टच्या घटनेनुसार नऊ सदस्यांची‎ कार्यकारिणी निवड झाली होती. आज‎ रोजी सहा संचालक मृत आहेत. तर एका‎ सदस्याने राजीनामा दिला आहे. तर ट्रस्टचे‎ उर्वरित सदस्य भरतसिंग पाटील हे सध्या‎ स्वयंघोषित अध्यक्ष तर रमेश परदेशी हे‎ स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी‎ ‎ ‎‎ कारभार पाहत आहेत.

      दर पाच वर्षांनी‎ निवडणूक घ्यावी, असे घटनेत नमूद‎ असतानाही १९९३ पासून आजवर कुठलीच‎ निवडणूक घेण्यात आली नाही. या बाबत‎ नितीन चव्हाण, रवींद्र कदम, मधुकर‎ पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे‎ प्रकरणेही दाखल केली.त्याचा निकाल‎ मधुकर पाटील व इतरांच्या बाजूने‎ लागलेला असल्याचे सांगण्यात आले.

     


कारभार नियमानुसार सुरू अाहे. आम्ही निवडणूक घेऊन निवडून आलो आहोत.‎ त्यानुसार काम पाहत आहोत. येथे बरखस्तीचा प्रश्न येतोच कुठे? ट्रस्टमध्ये आम्ही नऊ‎ लोक होतो. यातील सात मृत झाल्याने दोन सभासद उरल्याने धर्मादाय आयुक्तांकडे गेलो.‎ त्यांनी निवडणूक घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही निवडणूक घेऊन निवडून आलो.‎ निवडणुकीचा तो चेंज रिपोर्ट आम्ही धर्मादाय आयुक्तांना दिला दिला आहे. आता २९‎ जूनची तारीख दिली आहे. त्याचा काय निकाल लागतो त्यानंतर आम्ही उत्तर देऊ.‎ - भरतसिंग पाटील, तत्कालीन ट्रस्टचे सदस्य‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.